Site icon साप्ताहिक एकच ध्येय

17 जुलै रोजी पुणे येथे पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा

पुणे : कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, 481, रास्ता पेठ, व पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे मामासाहेब मोहोळ महाविद्यालय, कला, वाणिज्य आणि विज्ञान, 48/1-अ, एरंडवणा, पौड रोड, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने बुधवार, दि. 17 जुलै रोजी सकाळी 10 वाजता, पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे मामासाहेब मोहोळ महाविद्यालय, कला, वाणिज्य आणि विज्ञान, 48/1-अ, एरंडवणा, पौड रोड, पुणे येथे पंडीत दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आलेले आहे, उमेदवारांनी या मेळाव्याअतंर्गत खाजगी क्षेत्रातील उपलब्ध असणा-या विविध प्रकारच्या जागांसाठी प्रत्यक्ष मुलाखतीस (Walk-in-Interview) उपस्थित राहून या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागाच्या सहायक संचालीका अनुपमा पवार यांनी केले आहे.

पुणे जिल्ह्यातील पुणे शहर, पिंपरी-चिंचवड, पिरंगुट, शिंदेवाडी या औद्योगिक परिसरातील एकूण – 32 उद्येाजकांनी सहभाग दर्शविलेला असून, त्यांच्याकडून एकूण -2 हजार 809 रिक्तपदे कळविण्यात आलेली आहेत.

पुणे जिल्हयातील जास्तीत जास्त बेरोजगार उमेदवारांना रोजगार तसेच स्वयंरोजगार उपलब्ध करुन देण्याकरिता या रोजगार मेळाव्यामध्ये संधी उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. यास्तव किमान 8 वी, 9 वी पास, नापास, 10 वी, 12 वी पास, नापास व एमसीव्हीसी, पदवीधर, पदव्युत्तर पदवीधर, आयटीआय, डिप्लोमा, बीई, बीबीए, एमबीए इ. पात्रता धारण केलेल्या उमेदवारांनी बुधवार, दिनांक 17 जुलै 2019 रोजीच्या मेळाव्याअतंर्गत खाजगी क्षेत्रातील उपलब्ध असणा-या विविध प्रकारच्या जागांसाठी प्रत्यक्ष मुलाखतीस (Walk-in-Interview) उपस्थित राहावे. तसेच या मेळाव्यांतर्गत महिला उमेदवारांनाही प्राधान्याने नामांकित उद्योजकांकडे रोजगार मिळण्याच्या दृष्टीने संधी उपलब्ध करुन देण्यात आलेल्या आहेत. येताना उमेदवारांने आपली सर्व मुळ शैक्षणिक कागदपत्रे, पासपोर्ट साईज फोटो, अर्जाच्या (Resume) व मुलाखतीस आधारकार्डाच्या प्रती सोबत आणाव्यात, असेही श्रीमती पवार यांनी कळविले आहे.

Exit mobile version