बालकांचे मदतीचे हात अन् शुभेच्छांसह मुख्यमंत्र्यांचे शुभाशिर्वाद
Ekach Dheya
आयुषच्या बाबांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधीस दिले ११ हजार रुपये
मुंबई : राज्यभरातील चिमुरडी बालमंडळी कोरोना विषाणु विरूद्धच्या लढ्यात शासनासमवेत सहभागी होत असून आपल्या वाढदिवसाचा खर्च टाळून ही रक्कम मुख्यमंत्री सहाय्यता निधीत जमा करतांना दिसत आहेत… मुख्यमंत्र्यांशी त्याद्वारे संवाद साधतांना दिसत आहेत… तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे या मदतीसाठी धन्यवाद देताना या सर्व बालकांना वाढदिवसाच्या शुभेच्छा आणि शुभाशिर्वाद देत आहेत. यानिमित्ताने राज्यभरातील बालके आणि मुख्यमंत्र्यामधील हा ममत्वाचा धागा अधिक रेशीम आणि भक्कम होताना दिसत आहे.
आयुषने वाढदिवसाचा खर्च टाळून केली ११ हजार रुपयांची मदत पुण्याच्या चिंचवड येथे राहणाऱ्या विलास बाबाजी शिंदे यांनी आपल्या मुलाच्या आयुष विलास शिंदेच्या ५ व्या वाढदिवसाच्या निमित्ताने होणारा खर्च टाळून ११ हजार रुपयांची रक्कम मुख्यमंत्री सहाय्यता निधीत जमा केली आणि आपल्या सामाजिक दायित्वाचे पालन केले. कोविड १९ विषाणुविरुद्ध लढतांना फुल ना फुलाची पाकळी म्हणून आयुषच्या ५ व्या वाढदिवसाचा खर्च मी मुख्यमंत्री सहाय्यता निधीत जमा करत असल्याचे त्यांनी कळवले आहे.
मुख्यमंत्र्यांकडून शुभेच्छा मुख्यमंत्र्यांनी आयुषला त्याच्या आरोग्यसंपन्न दीर्घायुषासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. अशी संस्कारक्षम पिढी घडवणारे पालक आणि त्यांची मुले ही कौतूकास पात्र असून या सर्वांच्या एकजुटीवर, राज्यातील सर्व जनतेच्या सहकार्यावर आपण कोरोना विरुद्ध ची लढाई नक्की जिंकू असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला आहे तसेच यासाठी स्वंयशिस्तीचे, स्वच्छतेचे आणि सहकार्याचे आवाहन केले आहे. ज्यांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीत रक्कम जमा करावयाची आहे त्यांच्यासाठी माहिती-
इंग्रजीत-
Chief Minister’s Relief Fund-COVID 19
Savings Bank Account number 39239591720 State Bank of India,
Mumbai Main Branch,
Fort Mumbai 400023
Branch Code 00300 IFSC CODE- SBIN0000300
मराठीत-
मुख्यमंत्री सहाय्यता निधी-कोविड 19
बँकेचे बचत खाते क्रमांक- 39239591720 स्टेट बँक ऑफ इंडिया,
मुंबई मुख्य शाखा, फोर्ट, मुंबई 400023
शाखा कोड 00300 आयएफएससी कोड SBIN0000300
सदर देणग्यांना आयकर अधिनियम 1961 च्या 80 (G) नुसार आयकर कपातीतून 100 टक्के सूट देण्यात येते.