नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : बीड जिल्ह्यात मांगवडगाव इथं झालेल्या तिहेरी हत्याकांडातल्या पीडित कुटुंबियांची काल सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागाचे आणि जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी भेट घेतली आणि त्यांचं सांत्वन केलं.
हे प्रकरण जलदगती न्यायालयात चालवलं जावं यासाठी प्रयत्न करणार असल्याचं ते म्हणाले. पीडित कुटुंबाला मोफत अन्न धान्य आणि घरकुल देण्याचं आश्वासन त्यांनी दिली. याशिवाय या कुटुंबाला सामाजिक न्याय विभागाच्या वतीनं तत्काळ ४ लाख १२ हजारा रुपयांची आर्थिंक मदतही जाहीर केली आहे.