नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : ओदिशा आणि पश्चिम बंगालमध्ये येत्या चोवीस तासात उम्फून वादळ आणखी जास्त जोर धरण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे. यामुळे ओदिशा आणि पश्चिम बंगालमध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे.
या वादळाच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेल्या आपत्ती निवारण तयारीचा ओदिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी आज आढावा घेतला.