नगर विकास प्रधान सचिवांनी केली विविध भागांची पाहणी
Ekach Dheya
पुणे : नगर विकास विभागाचे प्रधान सचिव महेश पाठक यांनी भवानी पेठ क्षेत्रीय कार्यालय अंतर्गत स्वाब सेन्टर व प्रतिबंधित क्षेत्राची पाहणी केली. पहाणी अंतर्गत भवानी पेठेतील सावित्रीबाई फुले शाळेतील स्वाब सेंटरला भेट दिली. स्वाब सेंटर मधील नागरिकांची नोंदणी, स्वाब कक्ष, विलगिकरण कक्ष, प्रत्येक ठिकाणी नागरिकांकरिता करण्यात आलेली सुविधा व भोजन सुविधा याबाबतची माहिती घेतली. येथील सुविधांबाबत त्यांनी समाधान व्यक्त केले.
स्वाब सेंटर नंतर चुडामन तालीम, जुना मोटर स्टँड परिसरातील प्रतिबंधित क्षेत्रात करण्यात आलेला बंदिस्त भाग, अडथळे, पत्र्याने बंदिस्त केलेल्या भागाची पहाणी केली. पहाणी प्रसंगी त्यांनी येथील परिस्थितीबाबत अविनाश बागवे, रफिक शेख, मनपा आयुक्त शेखर गायकवाड, साखर आयुक्त सौरभ राव, अतिरिक्त आयुक्त रुबल अगरवाल, उपआयुक्त माधव देशपांडे, क्षेत्रीय अधिकारी सोमनाथ बनकर, परिमंडळ वैद्यकीय अधिकारी डॉ,राजेश दिघे, डॉ,अब्दुल सलाम सुतार, सहाययक आरोग्यप्रमुख डॉ, वैशाली जाधव, उपायुक्त माधव जगताप आदींशी चर्चा केली.
या परिसरातील मंजुळाबाई चाळीत संशयित व बाधित रुग्ण आढळल्यामुळे या चाळीस भेट दिली.याप्रसंगी अरविंद शिंदे, मनपा आयुक्त शेखर गायकवाड,साखर आयुक्त सौरभ राव, अतिरिक्त मनपा आयुक्त रुबल अगरवाल यांच्याशी सविस्तर चर्चा केली. येथील सुविधांबाबत येथील नागरिक व चाळीचे सचिव यांच्याशीही चर्चा केली.
याप्रसंगी सहपोलिस आयुक्त डॉ,संजीव शिंदे, वरिष्ठ पोलीस अधिकारी स्वप्ना गोरे, सह महापालिका आयुक्त विजय दहीभाते, क्षेत्रीय अधिकारी दयानंद सोनकांबळे व अन्य अधिकारी उपस्थित होते. तसेच पाटील इस्टेट परिसराची नगरविकास विभागाचे प्रधान सचिव महेश पाठक व महापौर मुरलीधर मोहोळ यांनी पहाणी केली.
या परिसरात आजपर्यंत आढळलेले संशयित रुग्ण,बाधित रुग्ण, स्वाब टेस्टिंग, नागरिकांना उपलब्ध करून देण्यात आलेल्या सुविधा,क्विक रिस्पॉन्स टीम कामकाज, कॉन्टॅक्ट ट्रेसिंग, सर्वेक्षण, जनजागृती अशा विविध स्वरूपाच्या करण्यात आलेल्या कामकाजविषयी माहिती त्यांनी घेतली.
याप्रसंगी स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने, दिलीप पोटे, मनपा आयुक्त शेखर गायकवाड,साखर आयुक्त सौरभ राव, पशुसंवर्धन विभागाचे आयुक्त सचिंद्र प्रतापसिंग, अतिरिक्त मनपा आयुक्त रुबल अगरवाल, परिमंडळ वैद्यकीय अधिकारी डॉ,संतोष मुळे, सहाययक आरोग्यप्रमुख डॉ,वैशाली जाधव, क्षेत्रीय वैद्यकीय अधिकारी डॉ, मृणालिनी कोलते, उपायुक्त नितीन उदास, क्षेत्रीय अधिकारी किशोरी शिंदे, विभागीय आरोग्य निरीक्षक आय येस इनामदार व अन्य अधिकारी उपस्थित होते.