श्रमिक रेल्वे सोडण्याकरता गंतव्य ठिकाण असलेल्या राज्याच्या परवानगीची गरज नाही
Ekach Dheya
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : स्थलांतरित कामगारांसाठी विशेष श्रमिक रेल्वे सोडण्याकरता गंतव्य ठिकाण असलेल्या राज्याच्या परवानगीची गरज नाही, असा खुलासा रेल्वे मंत्रालयानं केला आहे.
१ मे पासून आतापर्यंत रेल्वेनं एक हजार ५६५ रेल्वे गाड्या चालवून सुमारे २० लाख स्थलांतरित कामगारांना आपल्या मूळ गावी पोहोचवल्याचं, याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
सर्व राज्य सरकारांनी विशेष श्रमिक रेल्वेसंदर्भात नोडल अधिकाऱ्याची नियुक्ती करावी, आणि स्थलांतरित कामगारांना पाठवण्याची तसंच आपल्या राज्यात पोहोचलेल्या कामगारांची व्यवस्था करण्याचे निर्देश केंद्रीय गृह मंत्रालयानं दिले आहेत.