Site icon साप्ताहिक एकच ध्येय

‘जनतेच्या मनात विश्वास निर्माण व्हायला हवा’ शरद पवार यांचा राज्य सरकारला सल्ला

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राज्यातली परिस्थिती पूर्वपदावर येत असल्याबाबत जनतेच्या मनात विश्वास निर्माण व्हायला हवा. त्यासाठी राज्याचे मंत्री आणि अधिकाऱ्यांनी आपापल्या कार्यालयात उपस्थित राहायला हवं, असा सल्ला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी राज्य सरकारला दिला आहे.

मंत्र्यांच्या उपस्थितीबाबत आवश्यक ते आदेश जारी करण्याचा सल्लाही त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिलाय. कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर आज ठाकरे आणि पवार यांच्यात चर्चा झाली. त्यावेळी वाहतूक, शिक्षण, शेती, उद्योग क्षेत्रासोबतच विविध वर्गांना दिलासा देण्यासाठी आवश्यक उपाय योजनांबाबत आपल्या सूचना पवार यांनी मुख्यमंत्र्यांसमोर मांडल्या. कोरोनामुळे राज्यात निर्माण झालेली परिस्थिती, आव्हानं आणि उपाययोजनांबाबत दोन्ही नेत्यांनी चर्चा केली.

Exit mobile version