19 मे 2020 ते 24 मे 2020 पर्यंत अर्ज उपलब्ध असेल
नवी दिल्ली : विविध भारतीय विद्यार्थ्यांकडून प्राप्त झालेल्या निवेदन पाहता असे लक्षात आले आहे की, परदेशातील महाविद्यालयात प्रवेश घेण्याचे ठरवलेले विद्यार्थी आता कोविड-19 मुळे बदललेल्या परिस्थितीमुळे देशात राहूनच शिक्षण घेण्यासाठी उत्सुक असून ते जेईई (मुख्य) 2020 परीक्षा देऊ इच्छितात आणि म्हणूनच केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री रमेश पोखरीयाल निशांक यांनी एनटीएला जेईई (मुख्य) 2020 साठी ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी शेवटची संधी देण्याचा सल्ला दिला आहे. इतर विद्यार्थी, जे इतर कोणत्याही कारणामुळे अर्ज भरण्याची प्रक्रिया पूर्ण करू शकले नाहीत किंवा ऑनलाईन अर्ज भरू शकले नाहीत ते देखील आता अर्ज करू शकतात.
कोविड -19 मुळे अशा विद्यार्थ्यांना होणार्या अडचणी लक्षात घेता राष्ट्रीय चाचणी संस्था (एनटीए) जेईई (मुख्य) 2020 परीक्षेसाठी आता नव्याने अर्ज करण्याची किंवा ऑनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया पूर्ण करण्याची आणखी एक (अंतिम) संधी देत आहे.
सर्वांच्या असे निदर्शनास आणून दिले आहे की ऑनलाईन अर्ज भरण्याची / प्रक्रिया पूर्ण करण्याची सुविधा फक्त jeemain.nta.nic.in या संकेतस्थळावर 19 मे 2020 ते 24 मे 2020 पर्यंत उपलब्ध आहे.
संध्याकाळी पाच वाजेपर्यंत ऑनलाईन अर्ज /प्रक्रिया पूर्ण केलेले अर्ज स्वीकारले जातील आणि परीक्षा शुल्क रात्री 11.50 पर्यंत जमा करावे.
आवश्यक परीक्षा शुल्क क्रेडिट / डेबिट कार्ड / नेट बँकिंग / यूपीआय आणि पेटीएमद्वारे भरता येईल.
अधिक स्पष्ट माहितीसाठी, उमेदवार आमचे संकेतस्थळ jeemain.nta.nic.in वर अपलोड केलेले माहिती बातमीपत्र पाहू शकतात.
अद्ययावत माहितीसाठी उमेदवार आणि त्यांच्या पालकांनी jeemain.nta.nic.in आणि www.nta.ac.in या संकेतस्थळांना भेट द्यावी. अधिक स्पष्टीकरणासाठी उमेदवार 8287471852, 8178359845, 9650173668, 9599676953 आणि 8882356803 वर संपर्क करू शकतात किंवा jeemain@nta.ac.in या इमेलवर मेल करू शकतात.
📢Students who dropped the idea to study abroad, here is your chance to pursue your studies in India.
I have advised @DG_NTA to give one more opportunity to students to submit new/complete online application form for JEE (Main) 2020.
Hurry! Forms available till 24th May. pic.twitter.com/hSwXQ9GBjX— Dr Ramesh Pokhriyal Nishank (@DrRPNishank) May 19, 2020