नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाने तृतीयपंथी व्यक्ती (हक्क संरक्षण) विधेयक 2019 सादर करण्याच्या प्रस्तावाला मान्यता दिली. संसदेच्या पुढील सत्रात हे विधेयक सादर केलं जाईल.
तृतीयपंथी व्यक्तींच्या सामाजिक, आर्थिक आणि शैक्षणिक सबलीकरणासाठी या विधेयकाची मदत होईल.
परिणाम
मोठ्या प्रमाणावर तृतीयपंथी व्यक्तींना या विधेयकाचा फायदा होणार आहे. समाजाकडून तृतीयपंथी व्यक्तींवर लावला जाणारा कलंक, त्यांच्यासंदर्भात केला जाणारा भेदभाव आणि त्यांचा होणारा छळ या विधेयकामुळे कमी होण्यास मदत होणार आहे आणि तृतीयपंथी व्यक्तींना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणले जाईल. या विधेयकामुळे तृतीयपंथी व्यक्ती समाजाच्या मुख्य प्रवाहात येऊन समाजासाठी सदस्य म्हणून त्यांचा योग्यरीत्या चांगला उपयोग होऊ शकेल.