Site icon साप्ताहिक एकच ध्येय

गडचिरोली जिल्ह्यात नक्षलवाद्यांकडून मालट्रक्सची जाळपोळ

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : गडचिरोली जिल्ह्यात नक्षली अतिरेक्यांनी काल ४ मालवाहू ट्रक्स जाळल्याचं आज पोलिसांनी सांगितलं.

नक्षली कमांडर सृजनक्का १ मे रोजी पोलीस चकमकीत ठार झाली. तिच्या नावावर १५५ गंभीर गुन्ह्यांची नोंद होती. त्याच्या निषेधार्थ या भागात आज अतिरेक्यांनी बंद पुकारला आहे. धानोरा तालुक्यात सावरगाव- मुरुमगाव रस्त्यावर वाहतूक रोखून नक्षल्यांनी ४ ट्रक्सना आग लावली.

गेल्या रविवारी पोयारकोटी – कोपर्शीच्या जंगलात झालेल्या चकमकीत २ पोलीस शहीद झाले तर ३ जखमी झाले होते.

Exit mobile version