कोविड19 चा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन १०० खाटांची व्यवस्था कोविड19 रुग्णांसाठी करण्याचे महानगरपालिकेचे आदेश
Ekach Dheya
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : मुंबईत कोविड19 चा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन महानगरपालिकेने सर्व २४ प्रभागात लहानमोठ्या खासगी रुग्णालय आणि शुश्रुषा गृहांमधून किमान १०० खाटांची व्यवस्था कोविड19 रुग्णांसाठी करण्याचे आदेश जारी केले आहेत.
यात अतिदक्षता कक्षातल्या १० खाटा असाव्यात असं आदेशात म्हटलं आहे. यामुळे आणखी किमान चोवीसशे खाटा उपलब्ध होतील. या रुग्णालयांना PPE किट्स महानगरपालिका पुरवणार आहे. जी रुग्णालयं, पॉलीक्लिनिक्स, आदेशानंतरही बंद राहतील त्यांच्या विरुद्ध पोलीस तक्रार नोंदण्याचे आदेश आयुक्तांनी दिले आहेत.
मुंबईत आतापर्यंत २३ हजार ९३५ कोरोना बाधित आढळले असून ८४१ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. पालिकेची एक हजार दक्षता पथकं दररोज ६ ते ७ लाख व्यक्तींचं सर्वेक्षण करीत असून आतापर्यंत ५८ लाख १४ हजार ३४० घरांचं सर्वेक्षण करुन ७ हजार ४४७ संशयित रुग्णांना कोविड केअर सेंटरमधे पाठवण्यात आलं.
राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना शासन सेवेमध्ये नियमित करण्यासाठी लातूर जिल्हा परिषदच्या सर्वसाधारण सभेत प्रस्ताव ठेवणार असल्याचं, परिषदेचे अध्यक्ष राहुल केंद्रे यांनी म्हटलं आहे. याबाबतची शिफारस शासनाकडे लवकरच करण्यात येणार असल्याचं आश्वासन केंद्रे यांनी राष्ट्रीय आरोग्य अभियान अधिकारी आणि कर्मचारी महासंघाच्या शिष्टमंडळाला दिलं आहे.