भारतीय रेल्वे स्थलांतरित कामगारांसाठी येत्या १ जूनपासून दररोज २०० रेल्वेगाड्या सोडणार
Ekach Dheya
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतीय रेल्वे स्थलांतरित कामगारांसाठी येत्या १ जूनपासून दररोज २०० रेल्वेगाड्या सोडणार आहे, या गाड्यांची आरक्षण नोंदणी आज सकाळी दहा वाजता सुरु झाली.
सुरुवातीच्या काही तासांमध्येच चार लाख तिकिटांची नोंदणी झाल्याचं वृत्त आहे. जनरल डब्यासाठीदेखील आरक्षण अनिवार्य आहे. केवळ आरक्षणधारक प्रवाशांनाच या
रेल्वेमधून प्रवास करता येईल, आरक्षण नसलेल्या किंवा प्रतीक्षा यादीतल्या प्रवाशांना रेल्वेत प्रवेश दिला जाणार नाही.
मेल, जलद प्रवासी आणि उपनगरीय रेल्वे सेवा बंदच राहणार आहेत.