देशांतर्गत प्रवासी विमान वाहतुकीसंदर्भात नागरी हवाई वाहतुक मंत्रालयानं मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत
Ekach Dheya
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : येत्या सोमवारपासून सुरू होत असलेल्या देशांतर्गत प्रवासी विमान वाहतुकीसंदर्भात नागरी हवाई वाहतुक मंत्रालयानं विमान वाहतुक कंपन्या, विमानतळं तसंच प्रवाशांसाठी मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत.
प्रवाशांना आरोग्य सेतु ॲप डाऊनलोड करणं, विमानतळात प्रवेश करण्यापूर्वी थर्मल सिक्रिंग – तापमान तपासणी कक्षातून चालत येणं तसंच विमान सुटण्याच्या किमान दोन तास आधी विमानतळावर पोहोचणं आवश्यक आहे, तर विमान वाहतुक कंपन्यांना प्रवाशांचं सामान निर्जंतुक करून घेणं आवश्यक आहे.
विमानतळावर सगळीकडे शारीरिक अंतर राखण्याच्या नियमाचं पालन करणं आवश्यक असल्याचं, याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.