नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : स्थलांतरीत मजुरांसाठी सोडलेल्या श्रमिक रेल्वेच्या तिकीटाचा खर्च मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून करण्यात येईल असं मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी जाहीर केलं होतं. या घोषणेनुसार पहिल्या टप्प्यात राज्यातल्या ३६ जिल्हाधिकाऱ्यांच्या खात्यात ५४ कोटी ७५ लाख ४७ हजार ०७० रुपये जमा केले होते.
त्यापैकी मुंबई, अहमदनगर, सातारा, सांगली सोलापूर, कोल्हापूर या सहा जिल्ह्यांना अतिरिक्त १२ कोटी ४४ लाख ०८ हजार ४२० रुपयांचा निधी देण्यात आला आहे. स्थलांतरीत मजुरांच्या रेल्वे भाड्यापोटी मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून आतापर्यंत ६७ कोटी १९ लाख ५५ हजार ४९० रुपये देण्यात आले आहेत.
कोरोनाच्या संकटकाळात अनेकजण आर्थिक मदत करत आहेत. यापैकीच एक, बालयोद्धा योहित महेंद्र पाटील यानं आपल्या वाढदिवसासाठी जमा केलेले १ हजार २७१ रूपये मुख्यमंत्री सहाय्यता निधीत जमा केले.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या मदतीसाठी योहित तसंच त्याच्या वडिलांचे आभार मानले आहेत. योहितप्रमाणंच सर्वांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधीत सढळ हाताने मदत करावी असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलं आहे. आपण आपली मदत