Site icon साप्ताहिक एकच ध्येय

अम्फान चक्रीवादळानं झालेलं नुकसान केंद्र सरकारनं राष्ट्रीय आपत्ती म्हणून घोषीत करावं

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अम्फान चक्रीवादळानं ओदिशा आणि पश्चिम बंगालचं झालेलं नुकसान केंद्र सरकारनं राष्ट्रीय आपत्ती म्हणून घोषीत करावं, अशी मागणी आज देशभरातल्या २२ विरोधी पक्षांनी केली आहे. या नेत्यांनी व्हिडिओ कॉन्फरंसिंगच्या माध्यमातून या बाबत ठराव मांडला तसंच मदत आणि पुनर्वसन कार्याला सर्वोच्च प्राधान्य देण्यात यावं, अशी मागणी केली आहे.

अम्फान चक्रीवादळानं नुकसान झालेल्या ओदिशा आणि पश्चिम बंगाल या राज्य आणि तेथील नागरिकांप्रती आपल्या संवेदना व्यक्त करून, या संकटाच्या काळात आपला पाठींबा त्यांना असल्याचं या पक्षांनी मांडलेल्या ठरावात नमूद केलं आहे. अम्फान चक्रीवादळ आणि कोरोना महामारी हा इथल्या लोकांवर दुहेरी आघात असल्याचं या ठरावात म्हटलं आहे.

काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी बोलावलेल्या या बैठकीला तृणमूल काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, द्रविड मुनेत्र कळघम, डावे पक्ष आणि अन्य पक्ष सहभागी झाले होते.

Exit mobile version