Site icon साप्ताहिक एकच ध्येय

आयएमडीच्या http://mausam.imd.gov.in संकेतस्थळावरील 7 सेवा उमंग अ‍ॅप्लिकेशनवर उपलब्ध

नवी दिल्ली : युनिफाइड मोबाइल अ‍ॅप्लिकेशन फॉर न्यू-एज गव्हर्नन्स (उमंग) चे उद्घाटन भू विज्ञान मंत्रालयाचे सचिव डॉ. एम. राजीवन यांनी आज 22 मे, 2020 रोजी केले. यावेळी भारतीय हवामानशास्त्र विभाग  आयएमडीचे महासंचालक डॉ. एम. महापात्रा, राष्ट्रीय इ प्रशासन विभाग एनजीडीचे अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी अभिषेक सिंह यावेळी उपस्थितीत होते.

शासनाच्या (केंद्र आणि राज्य) विविध सेवांचा लाभ एकाच ठिकाणी घेता यावा म्हणून भारत सरकारने उमंग हे मोबाइल अ‍ॅप सुरु केले असून ते एकसमान, सुरक्षित, विविध वाहिनी आणि विविध मंच असलेले बहुभाषिक अ‍ॅप आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या नागरिकांच्या मोबाइल फोनवर सरकारी सेवा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने 2017 मध्ये उमंग अ‍ॅप सुरू केले. विविध देयके चुकती करण्यासह  127 विभाग आणि 25 राज्यांमधील जवळपास 660 सेवा या अ‍ॅप वर सुरु असून अधिक प्रस्तावित आहेत.

भारतीय हवामानशास्त्र विभागाने (आयएमडी) अद्ययावत साधने व तंत्रज्ञानावर आधारित हवामानाचा अंदाज आणि इशारा विषयक सेवांचा प्रसार सुधारण्यासाठी अलिकडच्या वर्षांत विविध उपक्रम राबविले आहेत. हा उपक्रम पुढे वाढविण्यासाठी आयएमडीने डिजिटल इंडिया कार्यक्रमांतर्गत “उमंग अॅप” चा वापर केला आहे.

आयएमडीच्या http://mausam.imd.gov.in संकेतस्थळावरील 7 सेवा उमंग अ‍ॅप्लिकेशनवर उपलब्ध आहेत त्या अशा :

        

        

अ‍ॅप डाऊनलोड करण्यासाठी खालील लिंकवर उपलब्ध आहे:

Web: https://web.umang.gov.in/web/#/

Android: https://play.google.com/store/apps/details?id=in.gov.umang.negd.g2c

iOS: https://apps.apple.com/in/app/umang/id1236448857

Exit mobile version