पुणे विभागात अंत्योदय व प्राधान्य कुटुंब लाभार्थी योजनेअंतर्गत 27 लाख 21 हजार कुटुंबांना लाभ – विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर
Ekach Dheya
पुणे : पुणे विभागात स्वस्त धान्य दुकानांची संख्या 9 हजार 95 असून आज रोजी 9 हजार 86 दुकाने सुरु आहेत. स्वस्त धान्य दुकांनामधून पंतप्रधान गरीब कल्याण योजनेचे माहे मे 2020 साठी धान्यवाटप सुरु झाले असून आतापर्यंत 67.54 % धान्य वाटप झाले आहे. अंत्योदय व प्राधान्य कुटुंब लाभार्थी योजने अंतर्गत 27 लाख 21 हजार कुटुंबांतील लाभार्थ्यांना माहे मे महिन्याचे नियमित धान्य वितरण 94.98 टक्के आहे. या लाभार्थ्यांना 62 हजार 244.93 मे. टन अन्नधान्याचे वाटप करण्यात आले असल्याची माहिती विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी दिली.
पंतप्रधान गरीब कल्याण योजनेंतर्गत स्वस्तधान्य दुकानांमधून माहे मे 2020 साठी धान्यवाटप सुरु झाले असून 67.54 टक्के धान्यवाटप झालेले आहे. पुणे विभागात 22 मे 2020 रोजी शासकीय धान्य गोदामात 38 हजार 577 मेट्रिक टन धान्यसाठा उपलब्ध आहे. तर विभागात मार्केटमध्ये 15 हजार 673 मेट्रीक टन अन्नधान्याची तर 10 हजार 741 क्विंटल भाजीपाल्याची आवक झाली आहे..
पुणे जिल्हयात 9 हजार 93 मेट्रिक टन धान्यसाठा, सातारा जिल्हयात 7 हजार 332 मेट्रिक टन, सागंली जिल्हयात 9 हजार 720 मेट्रीक टन , सोलापूर जिल्हयात 3 हजार 785 मेट्रीक टन, कोल्हापूर जिल्हयात 8 हजार 646 मेट्रिक टन धान्यसाठयाची आवक झाली आहे. पुणे विभागात 10 हजार 741 क्विंटल भाजीपाल्याची आवक झाली आहे. यात पुणे जिल्हयात 6 हजार 128 क्विंटल, सातारा जिल्हयात 1 हजार 942 क्विंटल, सांगली जिल्हयात 624 क्विंटल सोलापूर जिल्हयात 2 हजार क्विंटल , कोल्हापूर जिल्हयात 37 क्विंटल, भाजीपाला आवक करणेत आला आहे.
केशरी कार्डधारकांसाठी 8/- रूपये प्रतिकिलो दराने प्रतिव्यक्ती 3 किलो गहू व 12/- रुपये प्रतिकिलो दराने प्रतिव्यक्ती 2 किलो तांदूळ वाटप करण्यात आले आहे. माहे मे 2020 साठी 40 हजार 401 मे.टन नियतन मंजूर झालेले आहे, त्यापैकी 40 हजार 401 मे.टन (100 %) धान्याची उचल झालेली आहे व 36 हजार 873 .31 मे.टन ( 91.27 %) धान्य वाटप झालेले आहे. माहे मे महिन्याचे नियमित मंजूर नियतन 65537.50 मे टन असून आज अखेर 65361.95 मे टन (99.73%) धान्याची उचल झालेली आहे.
प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेंतर्गत माहे एप्रिल मे व जून महिन्यासाठी चणाडाळ व तूरडाळ या दोन्हींपैकी एक डाळ 1 किलो या कमाल मर्यादेत मोफत वितरीत करावयाचे आहे. पुणे विभागासाठी 3 हजार 41 मे.टन नियतन मंजूर झाले असून माहे मे महिन्याचे मोफत तांदळासोबत डाळ वाटप करण्यात येत आहे. पुणे विभागात अंत्योदय व प्राधान्य कुटुंब लाभार्थ्यांना माहे मे महिन्याचे नियमित धान्य वितरण 94.98 % आहे. याअंतर्गत एकूण 27.21 लाख कुटुंबातील लाभार्थ्यांना 62 हजार 244.93 मे.टन अन्नधान्याचे वाटप करण्यात आलेले आहे.
प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना अंतर्गत पुणे विभागासाठी माहे मे 2020 मोफत तांदळाचे मंजूर नियतन 62 हजार 997 मे टन असून आज अखेर त्यापैकी 42 हजार 288.13 मे. टन (67.54%) धान्य लाभार्थ्यांना वितरीत करण्यात आलेले आहे.
प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेअंतर्गत माहे एप्रिल, मे व जून साठी चणाडाळ व तूरडाळ या दोन्हीपैकी एक डाळ 1 किलो या कमाल मर्यादित मोफत वितरीत करावयाचे आहे. पुणे विभागासाठी 3041 मे.टन नियतन मंजूर झाले असून माहे मे महिन्याचे मोफत तांदळासोबत डाळ वाटप करण्यात येत आहे. आज अखेर 497.81 मे टन (16.37%) डाळ लाभार्थ्यांना वितरीत करण्यात आली आहे.
पुणे विभागात सर्वसाधारणपणे गहू, तांदूळ, खादयतेल, डाळी इ. जिवनावश्यक वस्तुंची आवक ही लॉकडाऊन पुर्वीच्या आवकच्या तुलनेत सद्यस्थितीत 90.00% आहे. पुणे विभागात 20 मे 2020 अखेर एकूण 206 शिवभोजन केंद्र असून सर्व सुरू आहेत. पुणे विभागात शिवभोजन थाळयांचा जिल्हा मुख्यालयासाठी 8850 व ग्रामीण भागांसाठी 14250 असे एकूण 23100 उद्दीष्ट आहे 21 मे 2020 रोजी 18051 (78.14%) थाळयांचे वाटप झालेले आहे. पुणे विभागामध्ये जिवनावश्यक वस्तुंचा तसेच औषधांचा तुटवडा नसल्याचेही डॉ.म्हैसेकर यांनी सांगितले.