नवी दिल्ली : केंद्रीय सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्री तसेच रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी सर्व उद्योग संस्थांना आणि नोंदणीकृत सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांना पत्र लिहिले आहे. यंदाच्या पावसाळ्यात अधिकाधिक वृक्ष लागवड करण्याचे आवाहन गडकरी यांनी या पत्राद्वारे केले आहे.
प्रत्येक लघु उद्योगाने किमान 5 झाडे लावावीत. मध्यम उद्योगाने किमान 50 तर सूक्ष्म उद्योगाने शक्य होतील तेवढी झाडे लावावीत. या झाडांची निगाही राखली जावी, असे आवाहन गडकरी यांनी केले आहे.
झाडे कडूनिंब, पिंपळ इत्यादी प्रकारची देशी आणि स्थानिक परिस्थितीला योग्य असावीत. राष्ट्रीय किंवा राज्य महामार्ग तसेच जिल्हा मार्गांलगतही ही झाडे लावता येतील, असे गडकरी यांनी सुचवले आहे.