Site icon साप्ताहिक एकच ध्येय

आयात केल्या जाणाऱ्या वस्तू क्षमतेनुसार देशातच बनवल्या जाव्यात – निर्मला सीतारामन

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशाला आत्मनिर्भर बनवण्यावर केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी भर दिला आहे. आयात केल्या जाणाऱ्या वस्तू क्षमतेनुसार देशातच बनवल्या जाव्यात अशी अपेक्षा त्यांनी दूरदर्शनला दिलेल्या एका मुलाखतीत व्यक्त केली आहे.

निर्यात करण्याच्या उत्पादनांच्या निर्मीतीसाठी उपयोगी ठरणाऱ्या वस्तूंकरिता आयातीवर अवलंबून रहावंच लागेल, असंही अर्थमंत्र्यांनी यावेळी सांगितलं. सरकारच्या पॅकेजमुळे अर्थव्यवस्था सुरळित करण्यासाठी आवश्यक निधी उभारण्यात मदत होईल, असं त्या म्हणाल्या.

रिझर्व बँकेनं नुकत्याच घेतलेल्या निर्णयांचं त्यांनी स्वागत केलं. शेतकऱ्यांना पारंपरिक समस्यांतून मुक्त करण्यासाठी निश्चित निर्णय घेतल्याबद्दल त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं यावेळी आभार मानलं.

Exit mobile version