Site icon साप्ताहिक एकच ध्येय

वंदे भारत या मोहीमेअंतर्गत, मुंबईत एकूण १७ विमानांमधून राज्यातले २ हजार ४२३ नागरिक दाखल

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : परदेशात अडकलेल्या भारतीय नागरिकांना मायदेशी आणण्यासाठी सुरु असलेल्या वंदे भारत या मोहीमेअंतर्गत, मुंबईत एकूण १७ विमानांमधून, महाराष्ट्रातले २ हजार ४२३ नागरिक आले आहेत. यापैकी ९०० जण मुंबई शहरातले, १ हजार १३९ जण राज्यातल्या विविध जिल्ह्यांमधले तर ३७८ जण इतर राज्यांमधले आहेत. दरम्यान मुंबईत आलेल्या नागरिकांना वेगवेगळ्या ४३ हॉटेलांमधे क्वारंटाईन केलेलं आहे. क्वारंटाईनच्या नियमांची काटेकोर अंमलबजावणी करण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेनं ५० अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचं पथक, तर राज्य सरकारनंही १५ कर्मचाऱ्यांचं पथक स्थापन केलं आहे.

परदेशातून आलेल्या नागरिकांना त्यांचे जिल्हे आणि इतर राज्यांमधे पाठवण्याची व्यवस्था मुंबई उपनगर जिल्हाधिकारी कार्यालयाकडून केली जात आहे. दरम्यान येत्या काळात जोहान्सबर्ग, जकार्ता, लंडन, मनीला, टोकिओ, कोलम्बो, मॉरिशस, नैरोबी या आंतरराष्ट्रीय शहरांमधे अडकलेल्या असंख्य भारतीय नागरिकांना मुंबईत आणलं जाणार असल्याचं आमच्या प्रतिनिधीने कळवलं आहे.

Exit mobile version