Site icon साप्ताहिक एकच ध्येय

देशभरात कोरोनाचे ६ हजार ७६७ नवे रुग्ण,५४ हजार ४४०रुग्ण बरे

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशभरात काल कोरोनाचे ६ हजार ७६७ नवे रुग्ण आढळले तर १४७ रुग्णांचा मृत्यू झाला. देशात कोरोना विषाणूची लागण झालेल्यांची संख्या आता एक लाख ३१ हजार ८६८  झाली  आहे. या आजारामुळे देशात आतापर्यंत ३ हजार ८६७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या ७३ हजार ५६० रुग्ण उपचार घेत आहेत तर ५४ हजार ४४० रुग्ण बरे झाले असून, रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ३९ पूर्णांक २८ शतांश टक्के असल्याची माहिती आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.

राज्यात काल आणखी २ हजार ६०८ कोरोना विषाणू बाधित रुग्णांची नोंद झाल्यानं एकूण रुग्णांची संख्या ४७ हजार १९० झाली आहे. तर या आजारानं राज्यात काल ६०  रुग्णांचा मृत्यू झाला. आतापर्यंत एक हजार ८७७ जणांचा मृत्यू झाला आहे. काल राज्यभरात ८२१ जणांना उपचारानंतर बरे झाल्यानं घरी सोडण्यात आलं. राज्यात आतापर्यंत १३ हजार ४०४ रुग्ण कोरोना विषाणू मुक्त झाले आहेत. राज्यात सध्या ३२ हजार २०१ रुग्ण उपचार घेत आहेत.

मुंबईत काल ४० रुग्णांचा मृत्यू झाला तर १ हजार ५६६ नवे रुग्ण आढळले. आतापर्यंत २८ हजार ८१७ जणांना कोरोना संसर्ग झाला आहे.

Exit mobile version