खेलो इंडियातील खेळाडूंच्या खात्यात प्रत्येकी ३०००० रुपये भत्ता जमा
Ekach Dheya
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतीय क्रीडा प्राधिकरणानं, खेलो इंडियामध्ये सहभागी होणाऱ्या २ हजार ७४९ खेळाडूंच्या खात्यात प्रत्येकी ३०००० रुपये भत्ता जमा केला आहे. एकूण २ हजार ८९३ खेळाडूंना SAI स्वतःच्या खिशातून भत्ता देणार असून उर्वरित १४४ खेळाडूंच्या खात्यात मे महिन्याच्या अखेरीपर्यंत भत्ता जमा होईल. असं SAI नं जारी केलेल्या निवेदनात म्हटलं आहे.
खेळाडूंना आपल्या घरी परतण्यासाठी, तसंच दैनंदिन आहार यासाठीच्या खर्चासाठी हा भत्ता असल्याचं यात म्हटलं आहे.