नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : मुंबईत धारावीमधे ४ हजार ४०७ खाटांची क्षमता अलगीकरणासाठी उपलब्ध होत आहे. महापालिका अतिरिक्त आयुक्त जयस्वाल यांनी आज धारावीतील सुविधांची पाहणी केली. यामुळे धारावी भागातील अलगीकरणाचा दर आणि वेग वाढवणे शक्य झाले आहे. असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनच्या वतीने (एमएमआरसीएल) दोन कोविड कक्षाची उभारणी करण्यात येत आहे. कोरोनाचे मुंबईतील वाढते रुग्ण लक्षात घेऊन बांद्रा-कुर्ला कॉम्प्लेक्स ( बीकेसी) मध्ये एमएमआरडीएने १००८ खाटांचे रुग्णालय गेल्या आठवड्यात उभारल्यानंतर त्याच्याच शेजारी ९५० खाटाची व्यवस्था असलेले अत्याधुनिक रुग्णालय उभारण्याचे काम वेगाने सुरु आहे.