बिहारच्या ज्योतीकुमारीची सायकलपटू म्हणून चाचपणी करणार
Ekach Dheya
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : लॉकडाऊन च्या काळात सायकल वरून एक हजार किलोमीटरचा प्रवास करणाऱ्या बिहारच्या ज्योतीकुमारी या मुलीची, केंद्र सरकार सायकलींग या क्रीडाप्रकारात, सायकलपटू म्हणून चाचपणी करणार आहे.
नवी दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय क्रीडा संकुलात तिच्या कौशल्याची चाचणी घेऊन, पात्र ठरल्यास तिची राष्ट्रीय सायकलिंग अकादमीत प्रशिक्षणार्थी म्हणून निवड करण्यात येईल, असं केंद्रीय क्रीडामंत्री किरेन रिजिजू यांनी ट्विट मध्ये म्हटलं आहे.
यासाठी आपण साई म्हणजेच भारतीय क्रीडा प्राधिकरण आणि भारतीय सायकलींग महासंघाला सूचना करणार आहोत असं त्यांनी स्पष्ट केलं आहे ज्योतिकुमारीनं आपल्या वडिलांना पाठी बसवून, गुरुग्राम ते दरभंगा असा एक हजार किलोमीटरचा प्रवास केला होता.