ICMR कडून सरकारी आणि खासगी प्रयोगशाळांना चाचणीचा परवाना
Ekach Dheya
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : गेल्या २४ तासांत देशात कोविड १९च्या १ लाख ८ हजार ६२३ चाचण्या झाल्या असून आतापर्यंत एकूण २९ लाख ४३ हजार ४२१ चाचण्या झाल्याचं ICMR अर्थात भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेने म्हटले आहे.
कोविड चाचण्यांचे प्रमाण वाढावे, यासाठी ICMR ने सरकारी आणि खासगी प्रयोगशाळांना चाचणीचा परवाना दिला असून देशभरात एकूण ६०७ मान्यताप्राप्त प्रयोगशाळा कार्यान्वित करण्यात आल्या आहेत. यामध्ये ४२७ सरकारी तर १८० खासगी प्रयोगशाळांचा समावेश आहे.