Site icon साप्ताहिक एकच ध्येय

देशभरातल्या कोरोना चाचण्यांची एकूण संख्या 30 लाख 33 हजार

नवी दिल्ली : देशभरात गेल्या चोवीस तासात, कोरोनाच्या 90 हजार 170 चाचण्या झाल्या असून आतापर्यंत देशभरातल्या कोरोना चाचण्यांची एकूण संख्या 30 लाख 33 हजार 591 झाली आहे. ICMR म्हणजेच भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेनं आज ही माहिती दिली.

आय सी एम आर, कोरोना चाचणी केंद्र सातत्यानं वाढवत असून आतापर्यंत देशभरात, 428 शासकीय आणि 182 खाजगी, अशा एकूण 610 प्रयोगशाळांना आय सी एम आर नं मान्यता दिली आहे.

Exit mobile version