नागपूर महानगरपालिका क्षेत्रात मृत्युदर फक्त दोन टक्के – तुकाराम मुंढे
Ekach Dheya
नवी दिल्ली : कोरोना संसर्ग सुरु झाल्यापासून नागपूर महानगरपालिका क्षेत्रात 75 टक्के कोरोनाबाधित बरे झाले असून इथला मृत्युदर दोन टक्के आहे आणि तो राज्यात तसच देशात सर्वात कमी आहे अशी माहिती, नागपूर महानगरपालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दिली आहे.
कोरोनाबाधित रुग्ण आणि क्षेत्र लवकरात लवकर निश्चित करणं, त्यासाठी संपर्कात आलेल्यांचा जलद गतीनं शोध, त्वरेनं उपचार, अलगीकरण आणि मोठ्या प्रमाणावर सामूहिक संस्थात्मक विलगीकरण, अशा अनेक उपाययोजना कठोरपणे राबवल्यामुळे, नागपूर शहरात कोरोना उद्रेकावर नियंत्रण राखणं शक्य झालं असं त्यांनी आज पीटीआयशी बोलताना सांगितलं.
जिल्हा प्रशासन, महानगरपालिकेचा आरोग्य विभाग, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयं आणि पोलिस कर्मचारी यांचा यामध्ये मोठा वाटा आहे असं त्यांनी स्पष्ट केलं. नागपूर शहरात आतापर्यंत 406 रुग्णं आढळले असून 313 जण बरे झाले आहेत, तर 8 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.