उपराष्ट्रपती एम.एम.व्यंकैय्या नायडू यांनी घेतला सचिवालयांनी केलेल्या तयारीचा आढावा
Ekach Dheya
नवी दिल्ली : उपराष्ट्रपती एम.एम.व्यंकैय्या नायडू यांनी मंत्रालयीन विभागांच्या संसदीय स्थायी समित्यांच्या नियमीत बैठका सुरु व्हाव्यात यासाठी संसदेच्या दोन्ही सभागृहांच्या सचिवालयांनी केलेल्या तयारीचा आढावा घेतला. अशा बैठका सुरु करण्याची शक्यता, बैठका सुरु झाल्यातर त्यासाठीचे नियम याविषयी या वेळी चर्चा झाली.
या बैठका सुरु झाल्या तर बैठकीला येणाऱ्या सदस्यांची संख्या कमीत कमी असावी यावरही बैठकीत चर्चा झाली. संसदीय व्यवहारमंत्री प्रल्हाद जोशी हे देखील या बैठकीला उपस्थित होते.