पुणे विमानतळावर देशांतर्गत विमानसेवेतून नागरिकांचे आगमन – जिल्हाधिकारी राम
Ekach Dheya
पुणे : 25 मे 2020 पासून देशांतर्गत विमानसेवा सुरु झालेली आहे. 25 मे 2020 रोजी 11 विमानाने 823 तर 26 मे 2020 रोजी 8 विमानाने 344 प्रवाशांचे असे एकूण 1,167 प्रवाशांचे पुणे विमानतळावर आगमन झालेले आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी दिली आहे.
या येणा-या प्रवाशांबाबत पुणे महानगरपालिकेमार्फत थर्मल स्क्रिनिंग तसेच होम क्वारंटाईन सील ॲन्ड हेल्प डेस्कची सुविधा 24 X7 करण्यात आली आहे.
पुणे विमानतळ येथे उतरणा-या नागरिकांबाबत करावयाच्या कार्यवाहीबाबत मुख्य उद्यान अधीक्षक अशोक घोरपडे यांची तर त्यांच्या सहाय्याकरीता प्र.सहाय्यक जनसंपर्क अधिकारी योगेश हेंद्रे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांनी याकामी जिल्हाधिकारी कार्यालयाचे राजशिषटाचार अधिकारी अमृत नाटेकर यांच्या संपर्कात राहण्याचे तसेच वेळोवेळी करण्यात येत असलेल्या कार्यवाहीबाबतचा अहवाल सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.