पुणे विभागातील 3 हजार 674 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी
पुणे : पुणे विभागातील 3 हजार 674 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 7 हजार 719 झाली आहे. तर ॲक्टीव रुग्ण 3 हजार 689 आहे. विभागात कोरोनाबाधीत एकुण 356 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच 215 रुग्ण गंभीर असून उर्वरीत निरीक्षणाखाली आहेत, अशी माहिती विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर यांनी दिली.
यापैकी पुणे जिल्हयातील 6 हजार 303 बाधीत रुग्ण असून कोरोना बाधित 3 हजार 195 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 2 हजार 819 आहे. कोरोनाबाधित एकूण 289 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच 208 रुग्ण गंभीर असून उर्वरित निरीक्षणाखाली आहेत.
कालच्या बाधीत रुग्णांच्या संख्येच्या तुलनेत पुणे विभागात बाधीत रुग्णांच्या संख्येमध्ये एकूण 501 ने वाढ झाली आहे, यामध्ये पुणे जिल्ह्यात 404, सातारा जिल्ह्यात 26, सोलापूर जिल्ह्यात 31, सांगली जिल्ह्यात 3, कोल्हापूर जिल्ह्यात 37 अशी रुग्ण संख्येमध्ये वाढ झालेली आहे.
सातारा जिल्हयातील 335 कोरोना बाधीत रुग्ण असून 126 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 201 आहे. कोरोनाबाधित एकूण 8 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
सोलापूर जिल्हयातील 621 कोरोना बाधीत रुग्ण असून 291 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 275 आहे. कोरोना बाधित एकूण 55 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
सांगली जिल्हयातील कोरोना बाधीत 82 रुग्ण असून 47 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 33 आहे. कोरोना बाधित एकूण 2 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
कोल्हापूर जिल्हयातील कोरोना बाधीत 378 रुग्ण असून 15 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 361 आहे. कोरोना बाधित एकूण 2 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
आजपर्यत विभागामध्ये एकुण 74 हजार 968 नमूने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते, त्यापैकी 67 हजार 517 नमुन्यांचा अहवाल प्राप्त झाला आहे. तर 7 हजार 451 नमून्यांचा अहवाल प्रतीक्षेत आहे. प्राप्त अहवालांपैकी 59 हजार 688 नमून्यांचा अहवाल निगेटीव्ह असून 7 हजार 719 चा अहवाल पॉझिटिव्ह आहे.
(टिप : – दि.26 मे 2020 रोजी दुपारी 3.00 वा.पर्यंतच्या आकडेवारीनुसार)