नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोविड -१९ च्या रुग्णांवर हायड्रॉक्सीक्लोरोक्विन म्हणजेच HCQ ची क्लिनिकल चाचणी जागतिक आरोग्य संघटनेनं तात्पुरती स्थगित केली आहे. संघटनेचे महासंचालक टेड्रॉस अॅ्ड्नॉम घेबेरियसिस यांनी घोषणा केली.
गेल्या आठवड्यात, लॅन्सेट मेडिकल जर्नलनं HCQ आणि क्लोरोक्विन चा रुग्णालयात दाखल झालेल्या कोविड -१९ च्या रूग्णांवर काय परिणाम झाला, यासंबंधी निरीक्षण केलेला एक अहवाल प्रकाशित केला होता.
रूग्णांसाठी जेव्हा फक्त हे औषध किंवा मॅक्रोलाइड सोबत हे औषध वापरलं जातं तेव्हा मृत्यू दर जास्त असल्याचं अनुमान समोर आल्याचं या अहवालात म्हटलं होतं.