Site icon साप्ताहिक एकच ध्येय

वार्षिक गणपती उत्सव पुढे ढकलण्याचा निर्णय

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोविड -१९ च्या देशभर पसरलेल्या साथीच्या पार्श्वभूमीवर आपला वार्षिक गणपती उत्सव पुढे ढकलण्याचा निर्णय मुंबईतल्या जीएसबी गणेशोत्सव समितीनं घेतला आहे. १० दिवसांच्या गणेश महोत्सवाची सुरुवात २२ ऑगस्टला होणार आहे.

फेब्रुवारी महिन्यात येणाऱ्या ‘माघ शुद्ध चतुर्थी’ दरम्यान हा उत्सव साजरा करायचं समितीनं ठरवल्याची माहिती समितीचे विश्वस्त सचिव मुकुंद कामत यांनी दिली.

मुंबईतील श्रीमंत आणि प्रसिद्ध गणेश मंडळांपैकी एक असणाऱ्या जीएसबी मंडळाकडून गेल्या ६५ वर्षांपासून गणेश उत्सवाचे आयोजन केले जाते.

Exit mobile version