Site icon साप्ताहिक एकच ध्येय

आसाममध्ये संततधार पाऊस पडल्याने अनेक नद्या धोक्याच्या पातळीच्या वर आणि अनेक नवीन भाग जलमय

नवी दिल्ली : हवामान खात्याने येत्या दोन-तीन दिवसांत आसामच्या अनेक जिल्ह्यात वेगवेगळ्या ठिकाणी वादळी वारे आणि मुसळधार पावसाचा अंदाज वर्तविला आहे. राज्यातील सात जिल्ह्यांमध्ये सुमारे दोन लाख लोक आहेत. ग्वालपाडा आणि तीनसुकिया जिल्ह्यात सुमारे नऊ हजार लोकांनी मदत शिबिरात आश्रय घेतला आहे. पुरामुळे अनेक जिल्ह्यांतील पिकांचे नुकसान झाले असून रस्त्यांंचेसुध्दा नुकसान झाले आहे. दरम्यान, राज्यात संसर्ग झालेल्या पाचशे 74 कोरोना उपचारानंतर बरे झाली आहेत.

आसाममध्ये तटबंदी व रस्ते तुटल्यामुळे बरीच नवीन क्षेत्रे पाण्यात बुडून गेली आहेत. बर्‍याच नद्या धोक्याच्या पातळीच्या चिन्हावरुन वाहत आहेत. तसेच राज्यातील पूर परिस्थितीमुळे 2 लाखाहून अधिक लोक बाधित झाले आहेत.

ग्वालपाडा जिल्ह्यात राष्ट्रीय आपत्ती निवारण दल आणि राज्य आपत्ती निवारण दलाची पथके मदत व बचाव कार्यात तैनात करण्यात आली आहेत. ग्वालपाडा आणि तीनसुकिया जिल्ह्यातील नऊ हजाराहून अधिक लोकांना मदत शिबिरांमध्ये हलविण्यात आले आहे.

एक हजार हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रात आलेल्या पुरामुळे पिकाचे नुकसान झाले आहे. खडकांच्या घसरणीमुळे काही काळ लुमडिंग-बदरपूर विभागातील रेल्वे गाड्यांच्या येण्या-जाण्यावर परिणाम झाला, परंतु मदतकार्यानंतर रेल्वे सेवा पुन्हा सुरू करण्यात आली.

Exit mobile version