मुंबई : राज्यात लॉकडाऊनमुळे अडकलेले स्थलांतरित मजूर आणि इतरांना त्यांच्या राज्यांमधे पाठवण्यासाठी काल संध्याकाळपासून ९३ गाड्या सोडण्यात आल्या. त्यातून उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड, तामीळनाडू, पश्चिम बंगाल आणि इतर राज्यांमधल्या १ लाख ३५ हजार लोकांना पाठवल्याचं रेल्वे अधिकाऱ्यांनी आज सांगितलं.
मुंबईत काल रात्री उशिरा स्थलांतरित मजुरांनी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस तसंच लोकमान्य टिळक टर्मिनसवर मोठी गर्दी केली. हजारो कामगार कुटुंबांसह जमा झाल्यानं पोलिसांची तारांबळ उडाली. सीएसएमटी स्थानकाची क्षमता २३ रेल्वे गाड्यांची असताना या स्थानकावरून ४९ गाड्यांचं वेळापत्रक लावलं होतं.
इंजिन उपलब्ध नसल्यानं प्रवासी भरलेल्या काही गाड्या तीन तासापेक्षा अधिक वेळ स्थानकावर थांबून राहिल्या होत्या, असं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.