Site icon साप्ताहिक एकच ध्येय

लॉकडाऊनच्या काळात ४३३ सायबर गुन्हे दाखल; २३४ जणांना अटक

मुंबई : लॉकडाऊनच्या काळात राज्यामध्ये, काही गुन्हेगार व समाजकंटक गैरफायदा घेण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांच्याविरुद्ध महाराष्ट्र सायबर विभागाने  कठोर पावले उचलली आहेत. राज्यात सायबरसंदर्भात ४३३  गुन्हे दाखल झाले असून २३४ व्यक्तींना अटक केली आहे़, अशी माहिती महाराष्ट्र सायबर विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक यांनी दिली.

राज्यातील विविध पोलीस स्टेशन मध्ये एकूण ४३३ गुन्ह्यांची (ज्यापैकी २६ N.C आहेत) नोंद २६ मे २०२० पर्यंत झाली आहे.

महाराष्ट्र सायबरने दाखल केलेल्या गुन्ह्यांमध्ये व्हाट्सअप मेसेजेस फॉरवर्ड केल्याप्रकरणी १८१ गुन्हे तर आक्षेपार्ह फेसबुक पोस्ट्स शेअर केल्याप्रकरणी १७० गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. टिकटॉक व्हिडिओ शेअर प्रकरणी २२ गुन्हे दाखल झाले आहेत. ट्विटरद्वारे आक्षेपार्ह ट्विट केल्याप्रकरणी ८ गुन्हे, इंस्टाग्रामवरून चुकीच्या पोस्ट टाकल्याप्रकरणी ४ गुन्हे तर अन्य सोशल मीडियाचा (ऑडिओ क्लिप्स, यूट्यूब) गैरवापर केल्या प्रकरणी ४८ गुन्हे दाखल झाले आहेत. त्यामध्ये आतापर्यंत २३४ आरोपींना अटक केली आहे तर यापैकी १०५ आक्षेपार्ह पोस्ट्स टेकडाऊन (takedown) करण्यात यश आले आहे.

नाशिक शहर

नाशिक शहर पोलीस स्टेशनमध्ये एका गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे, आरोपीने आपल्या फेसबुक प्रोफाईलवर दोन धर्मात तेढ निर्माण होईल अशा आशयाचा मजकूर असणारी पोस्ट टाकली होती, त्यामुळे कोरोना महामारीच्या काळात परिसरात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकला असता.

Exit mobile version