कोविड ग्रस्त रुग्णांवर मोफत किंवा माफक दरात उपचार करणारी खासगी रुग्णालयं अंकित करण्याची सर्वोच्च न्यायालयाची केंद्र सरकारला सूचना
Ekach Dheya
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोविडग्रस्त रुग्णांवर मोफत किंवा माफक दरात उपचार करता येतील, अशी खासगी रुग्णालयं अंकित करावीत, असं सर्वोच्च न्यायालयानं केंद्र सरकारला सांगितलं आहे. कोविडग्रस्तांवर उपचाराच्या दरांवर नियंत्रण आणण्यासंदर्भात एका याचिकेवर आज सरन्यायाधीश शरद बोबडे यांच्या अध्यक्षतेखालच्या पीठासमोर, सुनावणी झाली.
देशात अनेक खासगी तसंच धर्मदाय रुग्णालयांना सरकारने मोफत किंवा नाममात्र दराने भूखंड उपलब्ध करून दिलेले आहेत, त्या रुग्णालयांनी कोविडग्रस्त रुग्णांवर मोफत उपचार करावेत, असं न्यायालयानं म्हटलं आहे. आपत्तीच्या काळात खासगी रुग्णालयांकडून रुग्णांची उपचार दरासंदर्भात लूट केली जात असल्याचं, या याचिकेत म्हटलं आहे.
शासकीय आरोग्य योजना किंवा आरोग्य विमा नसलेल्या कोविड रुग्णांचा खासगी रुग्णालयातला उपचार खर्च सरकारने वहन करावा, अशी मागणीही या याचिकेत करण्यात आली आहे.