इयत्ता दहावीच्या भूगोलाच्या परीक्षेबाबत गुणवाटप निश्चित
Ekach Dheya
मुंबई (वृत्तसंस्था) : लॉकडाऊनमुळे रद्द झालेल्या, इयत्ता दहावीच्या भूगोलाच्या परीक्षेबाबत गुणवाटपाची पद्धत महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळानं निश्चित केली आहे. त्यानुसार, इतर विषयांच्या लेखी परीक्षांच्या गुणांच्या सरासरीइतके गुण भूगोलाच्या विषयाला दिले जाणार असल्याची मंडळाच्या अध्यक्ष शकुंतला काळे यांनी दिली.
मंडळानं गुणवाटपाबाबत पाठवलेला प्रस्ताव राज्य सरकारनं मंजूर केला आहे. या गुणपद्धतीसाठी केवळ विद्यार्थ्यांनी दिलेल्या लेखी परीक्षेचेच गुण ग्राह्य धरले जाणार आहेत. याच पद्धतीनं दिव्यांग विद्यार्थ्यांच्या कार्यशिक्षण विषयाच्या गुणांचंही वाटप केलं जाणार आहे.