मुंबई (वृत्तसंस्था) : कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या आरोग्य विभागातल्या एका डॉक्टरला कोरोनाची लागण झाल्याचं स्पष्ट झाल्यानंतर पालिकेची प्रशासकीय इमारत आज बंद केली आहे. ही इमारत पूर्णपणे निर्जंतुक केली जाणार असल्याचं पालिकेच्या जनसंपर्क अधिकारी माधुरी पोफळे यांनी सांगितलं.
बाधित डॉक्टरच्या संपर्कात आलेल्या सर्वांचा शोध घेण्याचं काम सुरु असल्याची माहिती त्यांनी दिली. दरम्यान, ठाण्यात काल १० डॉक्टर कोरोनाबाधित आढळल्यामुळे इंडियन मेडिकल असोसिएशनच्या ठाणे शाखेनं चिंता व्यक्त केली आहे.