महिला, लहान मुलं आणि पौगंडावस्थेतल्या व्यक्तींना कोरोना चाचणी अहवाल न मागता अत्यावश्यक उपचार द्यावे
Ekach Dheya
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कॅल्शियम, ओआरएस, जस्त, गर्भ निरोधक, लोह यासारख्या अत्यावश्यक औषधांचे घरपोच वितरण करण्याचा सल्ला केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिला आहे. गर्भवती, माता, नवजात अर्भक, पौंगडावस्थेतल्या व्यक्तींच्या आरोग्यासाठी आणि पोषणासाठी आवश्यक औषधे आणि इतर वस्तुंचा समावेश अत्यावश्यक वस्तूंमध्ये करावा असा सल्ला आरोग्य मंत्रालयानं दिला आहे.
महिला, लहान मुलं आणि पौगंडावस्थेतल्या व्यक्तींना कोरोना चाचणी अहवाल न मागता अत्यावश्यक उपचार द्यावे. अ जीवनसत्व, डायरिया नियंत्रण, जंत नियंत्रण वगैरेंसाटी मोहिम आखण्याचा सल्लाही देण्यात आला आहे.