अमरावती जिल्ह्यातून राज्याच्या अन्य भागात मालवाहतूक होणार सुरु
Ekach Dheya
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अमरावती जिल्ह्यातून राज्याच्या अन्य भागात मालवाहतूक सुरु होणार असून परिवहन विभाग आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करून देणार आहे. अमरावती जिल्ह्यातल्या बस स्थानकावर मालवाहतुकीसाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली असून यासाठी अमरावतीच्या विभागीय भांडार अधिकाऱ्यांची समन्वय अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
परिवहन महामंडळाची माल वाहतूक सेवा अत्यंत माफक दरात आणि सुरक्षित असून जिल्ह्यातले व्यापारी, शेतकरी आणि अन्य व्यावसायिकांनी या सेवेचा लाभ घ्यावा, असं आवाहन परिवहन मंडळानं केलं आहे.