नदीपात्र पुनर्स्थापित करण्यासह विविध शिफारसींचा अहवाल मुख्यमंत्र्यांना सादर
Ekach Dheya
नवी दिल्ली : गेल्या वर्षी भीमा आणि कृष्णा नदीच्या खोऱ्यात उद्भवलेल्या पूरपरिस्थितीचे विश्लेषण करणारा वडनेरे समितीचा अहवाल आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना सादर करण्यात आला.
हवामान बदलाविषयकच्या महाराष्ट्र राज्य हवामान बदल रुपांतर धोरण परिणामकारकरित्या राबविणे,निषिध्द आणि प्रतिबंधीत क्षेत्रातील अतिक्रमणे प्राधान्याने हटविणे,आपत्ती व्यवस्थापन धोरणात्मक सुधारणा आणि कायदेशीर तरतुदींचे त्वरीत अवलंबन करणे, नदीपात्र पुर्नस्थापित करणे,आधुनिक पूर चेतावणी यंत्रणेचा वापर करणे, असुरक्षित क्षेत्राचे नकाशे तयार ठेवणे, अशा काही महत्त्वाच्या शिफारसी या समितीने केल्या आहे.
पूरपरिस्थितीचं आधूनिक तंत्रज्ञानाद्वारे विश्लेषण करुन कारणे शोधणे, भविष्यात पुराची दाहकता कमी करणे,त्यासाठी तांत्रिक उपाययोजना सुचवणे,धोरणे सुचवणे,महाराष्ट्रातील पूरपरिस्थितीचा जलशास्त्रीय अभ्यास करणे या तांत्रिक बाबींवर सखोल अभ्यास करत हा विस्तृत अहवाल वडनेरे समितीने तयार केला आहे.
पूरप्रवण भागात पूर नियंत्रणासाठी व भविष्यकालीन उपाययोजनांसाठी नक्कीच या अहवालाचा उपयोग होईल. असे जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी सांगितले.