टोळधाडीपासून बचावासाठी पालघर जिल्हाधिकाऱ्यांचं मार्गदर्शन
Ekach Dheya
नवी दिल्ली : पालघर जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांनी टोळधाडीचा धोका लक्षात घेऊन सावध रहावं अशी सूचना जिल्हाधिकारी डॉ . कैलास शिंदे यांनी केली आहे. रात्री ७ ते ९ च्या दरम्यान त्यांच्या झुंडी शेतात उतरण्याची शक्यता असते.
त्यामुळे गावकऱ्यांनी आळीपाळीने पहारा द्यावा तसंच स्थानिक प्रशासनाने खंदक खणावे, मोठा आवाज करणारे ढोल ताशे, भांडी इत्यादी वाजवण्याची व्यवस्था करावी, आवश्यक तिथे कीडनाशकांची फवारणी पिकांवर करावी, अशा सूचना त्यांनी केल्या आहेत.