Site icon साप्ताहिक एकच ध्येय

कोरोनामुळे अग्निशमन दलातल्या दोन जवानांचा मृत्यू

नवी दिल्ली : कोरोनामुळे अग्निशमन दलातल्या दोन जवानांचा मृत्यू झाला त्यांच्या कुटुंबातल्या एका वारसाला नोकरी आणि आर्थिक मदत दिली जाणार आहे. त्याबाबतचा प्रस्ताव तयार झाला असून पालिका आयुक्तांकडे मंजुरीसाठी पाठवला असल्याचं मुंबई अग्निशमन दलाचे प्रमुख प्रभात रहांगदळे यांनी सांगितलं.

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी रुग्णालये, रस्ते,  इमारत परिसर अशा विविध ठिकाणी जंतूनाशक फवारणी केली जात आहे. ही फवारणी अग्निशमन दलाचे जवान करत असून  हे काम त्यांच्या जिवावर बेतत आहे. आतापर्यंत अग्निशमन दलाच्या ४० जवानांना कोरोनाची लागण झाली आहे.

Exit mobile version