इयत्ता अकरावी उच्च शिक्षण घेणाऱ्या स्वाधार योजनेच्या नियमांमध्ये बदल
Ekach Dheya
नवी दिल्ली : इयत्ता अकरावी आणि त्यापुढच्या उच्च शिक्षण घेणाऱ्या अनुसूचित जाती आणि नवबौद्ध विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या स्वाधार योजनेच्या नियमांमध्ये आता बदल करण्यात आला आहे.
मोठी शहरे, महानगरपालिका, जिल्ह्याचे ठिकाण यापूरती ही योजना मर्यादित न ठेवता आता तालुकास्तरावर शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनाही या योजनेचा लाभ देण्यात येणार आहे.
ही माहिती सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी दिली.तसंच पूर्वीच्या शासन निर्णयाप्रमाणे शहरापासून 5 किमी हद्दीपर्यंत महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनाच या योजनेतील सवलती लागू होत्या, ही मर्यादा आता 10 किमी पर्यंत वाढविण्यात येणार असल्याचेही मुंडे यांनी सांगितलं.