Site icon साप्ताहिक एकच ध्येय

टाळेबंदीच्या काळातही राज्यातून सुमारे ३ लाख टन शेतमालाची निर्यात

नवी दिल्ली : कोरोना टाळेबंदीच्या काळात सर्व प्रकारच्या वाहतूक सेवा मर्यादित असताना राज्याच्या कृषी आणि पणन विभागानं २ लाख ९९ हजार मेट्रिक टन मालाची निर्यात केली आहे.

त्यात ८ हजार ६४० टन आंबा,३३ हजार ९४८ टन केळी, ९ हजार ५०९ टन द्राक्ष, १ हजार ७७३ टन डाळिंब, त्याचबरोबर २ लाख २६ हजार टन कांदा, ६५३ टन लिंबू, १ हजार ५२२ टन मिरची, १ हजार १६८ टन आलं आणि १७ हजार १५१ टन इतर फळं आणि, भाजीपाल्याचा समावेश आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा केळी, लिंबू, मिरची आणि आल्याची जास्त निर्यात झाली आहे.

Exit mobile version