Site icon साप्ताहिक एकच ध्येय

आरोग्य खात्यातल्या कर्मचाऱ्यांना सेवेत सामावून घेण्याबाबत राज्य सरकारनं एक जूनपर्यंत निर्णय घ्यावा

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आरोग्य खात्यातल्या २२ हजार कंत्राटी कर्मचाऱ्यांना सेवेत सामावून घेण्याबाबत राज्य सरकारनं एक जूनपर्यंत निर्णय घ्यावा, अशी मागणी महाराष्ट्र राज्य आरोग्य कर्मचारी समन्वय समितीनं केली आहे.

ही मागणी पूर्ण झाली नाही तर राज्यातले सर्व आरोग्य कर्मचारी १२ जून पासून बेमुदत संपावर जातील, असा इशारा समितीचे अध्यक्ष अरुण खरमाटे यांनी दिला आहे. ते आज सांगली इथं प्रसार माध्यमांशी ते बोलत होते.

दरम्यान या आरोग्य कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलनाऐवजी आजपासून रक्तदान सप्ताह सुरुवात केला. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रक्ताची टंचाई भासत आहे. अशावेळी आपल्या मागण्यांकडे सरकारचं लक्ष वेधण्यासाठी त्यांनी हे अभिनव रक्तदान आंदोलन केलं.

Exit mobile version