Site icon साप्ताहिक एकच ध्येय

मनरेगा अंतर्गत २६ हजार ९७९ कुटुंबांना रोजगार

मुंबई (वृत्तसंस्था) : महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजने अंतर्गत पालघर जिल्ह्यात २१ मे पर्यंत २ हजार ४१५ कामं सुरु झाली आहेत.

जिल्ह्यात २०-२१ या वर्षात १ एप्रिल पासून २६ हजार ९७९ कुटुंबांना रोजगार मिळाला असून यापैकी २५ हजार १७३ आदिवासी कुटुंब आहेत. त्यामुळे पालघर जिल्हा राज्यात  सर्वाधिक आदिवासी कुटुंबांना रोजगार उपलब्ध करून देणारा जिल्हा ठरला आहे.

Exit mobile version