Site icon साप्ताहिक एकच ध्येय

सौर आणि पवन ऊर्जेचा वापर करुन पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडवा

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशातल्या वीजक्षेत्रात आर्थिक शाश्वतीबरोबरच कार्यान्वयनात सक्षमता आणि ग्राहकांचं समाधान  वाढवण्याची गरज असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे.

उर्जा, नवीन आणि नवीकरणीय उर्जा विभागाच्या आढावा बैठकीत काल ते बोलत होते. वीजदर धोरणविषयक कायद्यात सुधारणा करणाऱ्या विधेयकाच्या मसुद्यावर तसंच वीज क्षेत्राला येणाऱ्या अडचणींवर यावेळी चर्चा झाली.

या क्षेत्राच्या अडचणी राज्यांगणिक बदलत्या असून एकच एक उपाय न शोधता त्या-त्या ठिकाणच्या अडचणी सोडवण्यावर भर द्यावा असं मोदी यांनी यावेळी सुचवलं. सौर ऊर्जेचा वापर कृषी पंप, शीतगृह, अशा बाबींना प्रोत्साहन द्यावं, प्रत्येक राज्यात किमान एका शहरात पूर्णपणे सक्षम सौरऊर्जा निर्मिती यंत्रणा असावी, अशा सूचना त्यानी केल्या.

सौर आणि पवन ऊर्जेचा वापर करुन समुद्रकिनाऱ्याच्या प्रदेशात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडवण्याची गरज आहे असं ते म्हणाले.

Exit mobile version