केंद्र सरकार ८ लाख मेट्रीक टन इतकं धान्य वितरण ३७ राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना करणार
Ekach Dheya
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्र सरकारनं मे आणि जून महिन्यात ८ लाख मेट्रीक टन इतकं धान्य वितरण ३७ राज्यं आणि केंद्रशासित प्रदेशांना करायचं ठरवलं आहे. राज्यांनी आतापर्यंत २ लाख टन इतक्या धान्याची उचल केली असल्याची माहिती भारतीय अन्न महामंडळानं दिली आहे.
याबाबत सर्व राज्यांशी समन्वय साधण्याचे निर्देश केंद्रीय ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्री राम विलास पासवान यांनी भारतीय अन्न महामंडळाला दिले आहेत. महामंडळाच्या परिक्षेत्रिय कार्यकारी संचालक आणि क्षेत्रिय महाव्यवस्थापक यांच्याशी वितरण आणि खरेदी याबाबत पासवान यांनी काल व्हिडिओ कॉन्फरन्स घेऊन आढावा घेतला.