Site icon साप्ताहिक एकच ध्येय

हिंदी चित्रपटसृष्टीतले प्रसिद्ध गीतकार योगेश यांचं काल मुंबईत निधन

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : हिंदी चित्रपटसृष्टीतले प्रसिद्ध गीतकार योगेश यांचं काल मुंबईत निधन झालं, ते ७७ वर्षांचे होते. १९७० च्या दशकात प्रदर्शित झालेल्या आनंद, रजनीगंधा, छोटी सी बात, बातो बातों में आदी चित्रपटांसाठी त्यांनी लिहिलेली गाणी रसिकांच्या आजही स्मरणात आहेत.

‘जिंदगी कैसी है पहेली’, ‘कहीं दूर जब दिन ढल जाए’ अशी अनेक गीतं लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचली. ‘रजनी’ या दूरदर्शन मालिकेचं त्यांनी लिहीलेलं शीर्षकगीत सर्वतोमुखी झालं होतं. गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांनी योगेश यांना ट्वीटरवर श्रद्धांजली वाहिली आहे.

Exit mobile version